नारायणगाव : प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील १४ नंबर कांदळी येथील तुळजाभवानी कला केंद्रात पहाटेच्या सुमारास दोन गटांमध्ये बारी लावण्याच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, कला केंद्राच्या बाजूला दारूच्या बाटल्या आढळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने परिसरात कचरा हटवलाआल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
👉 सांस्कृतिक कला केंद्र की आणखी काही?
कला केंद्राच्या नावाखाली येथे आणखी काही प्रकार सुरू होते का, याचीही आता चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. गोळीबाराचे नेमके कारण, सहभागी व्यक्ती आणि घटनास्थळी आढळलेल्या वस्तूंबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
📍 या प्रकरणात पुढे काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
⚠️ वरील माहिती प्राथमिक असून, पोलीस तपासानंतर अधिकृत माहिती स्पष्ट होईल.


