
मंचर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत मेहनत, शिस्त आणि सातत्य जोपासावे. चांगले शिक्षण व संस्कार यांच्या बळावर स्वतःची प्रगती साधत कुटुंब, गाव आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन साळी मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मोहन साळी यांनी केले. डॉ. मोहन साळी यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंचर क्रमांक १ येथील विद्यार्थ्यांना १०० क्रीडा गणवेशांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सतीश गुजराथी होते. या वेळी नगरसेविका अंजली बाणखेले, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश शिंदे, सचिव अभिषेक काजळे, सामाजिक कार्यकर्ते आशिष पुंगलिया, शिवकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम शेख तसेच शिक्षणतज्ज्ञ ज्ञानेश्वर शेटे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक लहू घोडेकर यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी अनंत यांनी केले, तर संतोष राक्षे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशा थोरात, कमल शिनलकर, मीना मुंढे, सचिन असवले, भारती कोकणी आणि सोनूताई वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

