नारायणगाव. १८ (प्रतिनिधी): जुन्नर तालुक्यातील वळणवाडी येथे बंद घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नारायणगाव पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण ₹२६ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १७) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास वळणवाडी येथील एका बंद घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत जुगार अड्ड्यावर कारवाई केली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कारवाईदरम्यान रोख रक्कम, चारचाकी व दुचाकी वाहने आणि जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ₹२६.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत..


