घोडेगाव् प्रतिनिधी :
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या संपामुळे येथील कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे. शासकीय कामाचा खोळंबा झाल्याने जमिनीचे खरेदी- विक्री व्यवहार, गृहकर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आणि इतर महत्वपूर्ण दस्तऐवज नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.घोडेगाव येथील आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातून शेकडोसह दुय्यम निबंधक श्रेणी-१ आंबेगांव कार्यालयनागरिक, शेतकरी आणि जेष्ठ नागरिक येथील कार्यालयात दररोज येत आहेत. मात्र कार्यालयाला टाळे असल्याने आणि कर्मचारी संपावर असल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागले आहे. यामध्येअनेक नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि. इतर फी भरली आहे. मात्र वेळेत नोंदणी होत नसल्याने बँक कर्जाची प्रकरणे रखडली आहेत. या संपामुळे केवळ घोडेगावच नव्हे, तर संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील शासकीय महसुलावरही परिणाम झाला आहे.दरम्यान पुण्यातील आंबेगाव येथील दुय्यम निबंधक क्रमांक २० येथील वरिष्ठ लिपिक रवींद्र कोळी यांना मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ नोंदणी मुद्रांक विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. आरोपींना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी पुण्यासह राज्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. आरोपींना अटक होईपर्यंत आंम्ही बेमुदत संप सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा नोंदणी मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने दिला आहे.


