भीमाशंकर : प्रतिनिधी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर-भीमाशंकर मार्गावरील राजेवाडी येथील बसथांब्याजवळ मुख्य रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे, तळेघर येथील ग्रामस्थ काळूराम कोकणे व करण कोळप, रोहित कोळप यांनी प्रसंगावधान राखत या खड्याभोवती दगड ठेवूनग्रामस्थांच्या मते संबंधितांनी दखल न घेतल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता वाहनचालकांना सावध केले. त्यामुळे संभाव्य अपघात टळल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा मार्ग श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाणारा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिक या रस्त्याचा वापर करतात. गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. मात्र, त्यानंतर रस्त्याची नियमित देखभाल होत नसल्याचा आरोपग्रामस्थांनी केला आहे. राजेवाडी येथील खड्डा मुख्य रस्त्याच्या मधोमध असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना तो सहज दिसून येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने गेले पाच महिन्यांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर हे नुकतेच खुले झाल्याने ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने या खड्ड्याची दुरुस्ती करून संपूर्ण मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याची वेळीच दखल घेण्याची आवश्यकता आहे.


