
पारगाव (कारखाना):- प्रतिनिधी
मा.संदीप सिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.शुभम कुमार सो, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.अमोल मांडवे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, विभाग खेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक पारगाव का. पोलीस ठाणे यांनी पारगाव का. पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा शोध घेणेकामी पारगाव का. पोलीस ठाणे अंतर्गत पथक तयार करून हरविलेले मोबाईलचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पारगाव का. पोलीस ठाणेकडून सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार मंगेश अभंग, संजय साळवे यांनी सी.ई.आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबींचे आधारे पोलीस ठाणे हद्दीतील मोबाईल मिळालेल्या लोकांशी संपर्क साधुन हरवलेल्या मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करून चिकाटीने व अथक परिश्रम करून मोबाईल शोध मोहिम राबविल्याने माहे मार्च २०२६ महिन्यामध्ये पारगाव का. पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले २,३४,०००/- रू किंमतीचे एकुण १३ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे. सदरचे मोबाईल श्री. सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक पारगाव का. पोलीस ठाणे यांचे हस्ते मुळ तक्रारदार यांना आज रोजी परत करण्यात आलेले आहेत. सदरची मोहिम अविरतपणे राबविण्यात येणार असल्याचे श्री. सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक, पारगाव का. पोलीस ठाणे यांनी सांगीतलेले आहे.सदरची कारवाई मा. संदीप सिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा.शुभम कुमार सो, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. अमोल मांडवे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक पारगाव का. पोलीस ठाणे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग, संजय साळवे यांनी पार पाडलेली आहे.- पारगाव का. पोलीस ठाणेकडून सन २०२५ २०२६ या कालावधीमध्ये आजमितीपर्यंत तकारदार यांचे गहाळ झालेले एकुण 13 मोबाईल तकारदार यांना परत करण्यात आलेले आहेत.


