
ओतूर: प्रतिनिधी : ओतूर शहरातील इसम नामे साहील जिवन तांबे वय २१ वर्षे रा. ओतूर ता. जुन्नर जि. पुणे याचे विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. सदरचा इसम हा वारंवार गुन्हे करत असल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने सदरच्या इसमा विरुध्द मा. उपविभागीय दंडाधिकारी, जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचर (पुणे) यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मा. उपविभागीय दंडाधिकारी, जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचर (पुणे) यांनी सदरच्या इसमा विरूध्द दाखल असलेले गुन्हे व इतर बाबी विचारात घेवुन इसम नामे साहील जिवन तांबे वय-२१ वर्षे रा. ओतूर ता. जुन्नर जि.पुणे यास दिनांक २७/०७/२०२७ रोजी पर्यंत पुणे व ठाणे जिल्हयातुन एक वर्षाच्या कालावधी करीता हद्दपार आदेश पारीत केले आहेत. सदरचे आदेश पारीत झाल्यांनतर आज दिनांक ०१/०८/२०२६ रोजी इसम नामे साहील जिवन तांबे यास अहील्यानगर जिल्यातील अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या नातेवाईकांडे सोडुन आदेशाची पुर्तता करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत सहील जिवन तांबे याने हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरूध्द कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी सांगीतले असुन जे गुन्हेगार वारंवार गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवतील त्यांचे विरुध्द सुध्दा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीर यांनी सांगीतले.सदरची कारवाई मा. संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण, मा. शुभम कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सोो. पुणे, मा. धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सोो. जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री. ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदिप आमणे, पो. हवा. दिनेश साबळे, पो.कॉ. अमोल शिंदे, पो.कॉ. योगेश उकीर्डे यांनी केली आहे.

